Monday, December 9, 2013

वेदनेला या मनाच्या कोणतेही नाव नाही
जो पुरात वाहुन गेला तो कुणाचाच गाव नाही

अस्तित्त्वाच्या अवशेषांचे दगड सारे ढासळलेले
पुतळ्यांच्या या जमान्यात जिवंततेला वाव नाही

जागोजागी शत्रुत्वाच्या  डोंब धुराचा  उसळलेला
कोणत्याही ग्रही आता शांततेस ठाव नाही

आला आणिक परतला प्रवास अखंड चाललेला
काळ वेळ जुळुन येते  लागत कोणास सुगावा नाही

मी सोडता सगळेचजण शहाणपण कोळुन प्यायलेले
हलाहल पचवित असल्याचा तरीही माज भाव नाही

शब्दांचा प्रपंच थाटणे इतुकेच आजवरी जमलेले
विचारांच्या मंथनात परि प्रतिभेचा कांगावा नाही