मोकळ्या आकाशात एकटक मी पहाते ढगांचे ते निराळे आकार विलक्षण अशा रंगांची मुक्त उधळण नजर बांधुन ठेवणारी
मग मनात काहीतरी वेगळच पण छानसं वाटतं कळत नाही या भावनेचं नाव काय कुठे तरी वाटतं जे हरवलेलं ते हेच आहे
जे शोधत होते ते हेच आहे
जे मिळवायचं आहे ते हेच आहे जिथे जायचय ते हेच आहे जिथुन आलेय ते हेच आहे
सारं काही आपलसं वाटतं ते ढग ते रंग अन नजर पोचेल तिथवर पसरलेलं आभळ मग उरत ते फ़क्त तजेलपण पहिल्या पावसच्या थेंबांनी पानावर अवतरणारं
मग कळतं आपणच पान,
तेजही आपण अन आभाळही आपणच
---- वैभवी भिडे