Thursday, August 16, 2012


मोकळ्या आकाशात एकटक मी पहाते ढगांचे ते निराळे आकार विलक्षण अशा रंगांची मुक्त उधळण नजर बांधुन ठेवणारी
मग मनात काहीतरी वेगळच पण छानसं वाटतं  कळत नाही या भावनेचं नाव काय कुठे तरी वाटतं जे हरवलेलं ते हेच आहे
जे शोधत होते ते हेच आहे
जे मिळवायचं आहे ते हेच आहे जिथे जायचय ते हेच आहे जिथुन आलेय ते हेच आहे
सारं काही आपलसं वाटतं ते ढग ते रंग अन नजर पोचेल तिथवर पसरलेलं आभळ मग उरत ते फ़क्त तजेलपण पहिल्या पावसच्या थेंबांनी पानावर अवतरणारं
मग कळतं आपणच पान,
तेजही आपण अन आभाळही आपणच
---- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment