Tuesday, March 13, 2012

ठरले होते


ओळख ना दाखवायची ठरले होते
नजर ना फ़िरवायची ठरले होते

पत्ता ना शोधायचा ठरले होते
रस्ताही बदलायचा ठरले होते

शब्द सारे खोडायचे ठरले होते
गाणे नवे लिहायचे ठरले होते

तू माझ्यात ना रहायचे ठरले होते
मी माझ्यातुन निघुन जायचे ठरले होते

No comments:

Post a Comment