Friday, August 12, 2011

आता काही उरले नाही



बोलायचे आता काही उरले नाही
सांगायचे आता काही उरले नाही

हातात हात घेउन चालणे आता उरले नाही
डोळ्यांच्या भाषेतले ते भाव आता उरले नाही

मिटल्या डोळ्यात स्वप्न आता उरले नाही
बाजी कुठली, कितीदा हरले मोजणे आता उरले नाही

कुठुन आलो, कुठे चाललो शोधणे आता उरले नाही
गर्दीत हरवताना एकटेपण उरले नाही

क्षणभर या आयुष्यात रमणे आता उरले नाही
श्वासांच्या गतीवर नियंत्रण आता उरले नाही

प्रश्नांचे कुठ्ल्याच उत्तर आता उरले नाही
जगाच्या आरोपांवर  स्पष्टीकरण आता उरले नाही

मनोवेगाच्या वारुला बंधन आता उरले नही
लेखणीला या रोखणारे शाप आता उरले नाही


3 comments:

  1. थोडी गेयता आण..... बाकी शब्द छान येतात तुला...

    ReplyDelete