बोलायचे आता काही उरले नाही
सांगायचे आता काही उरले नाहीहातात हात घेउन चालणे आता उरले नाही
डोळ्यांच्या भाषेतले ते भाव आता उरले नाही
मिटल्या डोळ्यात स्वप्न आता उरले नाही
बाजी कुठली, कितीदा हरले मोजणे आता उरले नाही
कुठुन आलो, कुठे चाललो शोधणे आता उरले नाही
गर्दीत हरवताना एकटेपण उरले नाही
क्षणभर या आयुष्यात रमणे आता उरले नाही
श्वासांच्या गतीवर नियंत्रण आता उरले नाही
प्रश्नांचे कुठ्ल्याच उत्तर आता उरले नाही
जगाच्या आरोपांवर स्पष्टीकरण आता उरले नाही
मनोवेगाच्या वारुला बंधन आता उरले नही
लेखणीला या रोखणारे शाप आता उरले नाही

थोडी गेयता आण..... बाकी शब्द छान येतात तुला...
ReplyDeletekeep it up :)
ReplyDeletegood one, avadya apun ko
ReplyDelete