कुठली माती कसली नाती
सारे आपुलेच गीत गाती
कितीही असोत हात हाती
काल प्रवाही ते निसटती
दिवस रात्र जाती येती
पाखरे नवे इमले बांधती
नवी घरटी नवे संगती
चार दिसांनी उडुन जाती
कशास चिंता का आठवती
दोन क्षणांचे सारे सोबती
कुणास ठाउक कुठे निवारा
कुठे नेई हा प्रवास सारा
तरी चालणे नच विरामा
पुन्हा खेळ अन पुन्हा भ्रमंती
पहिले
ReplyDeleteनाती गोती होती...
प्रेमाची अन आपुलकीची...
गुण्यागोविंदाने रहात होती...
नव्हती कटुता न नाती दुखाची...