Saturday, March 26, 2011

पाउस

तेव्हा वाटला होतं हा पाऊस कसा रिमझिम बरसतोय
प्रत्येक थेंबातून एक नवे गाणे आपल्यासाठीच रचतोय
आता मात्र हा पाऊस धो धो कोसळतोय
का तू नसल्याचे दु:ख रडून हलके करतोय?

तेव्हा वाटल होतं हा पाऊस कसा खुद्कन हसतोय
आपल्या नात्याचे मनापासून स्वागत करतोय
आता मात्र हा पाऊस उगाचच येतोय जातोय
का नाते संपल्याची खात्री करु पहातोय

तेव्हा वाटायच हा पाऊस कसा नक्षीदार पडतोय
तुझे माझे नाते मोत्यांच्या राशिनी सजवतोय
आता मात्र हा पाऊस कसा वेडावाकडा येतोय
का विखुरलेल्या मोत्यांना पुन्हा सांधु पहातोय

तो उनाड पाऊसही आता थकला भागला
वयाबरोबर तोही आता पोक्त होऊ लागला
या अखेरच्या वाटेवर तुझा हातही हातातून निसटला
तेव्हा काय आता काय पाउस मुकपणे मला साथ करीत रहिला

वैभवी भिडे

1 comment:

  1. sundar keval apratim .......


    या अखेरच्या वाटेवर तुझा हातही हातातून निसटला
    तेव्हा काय आता काय पाउस मुकपणे मला साथ करीत रहिला

    .........
    keep it up waiting for more poems vb

    ReplyDelete