एक इवलासा कोपरा माझ्या मनात लपलेला
आठवणींचा इंद्रधनु रंग त्यावर सजलेला
दुडुदुडु धावणार्या पावलांचे ठसे
म्हातार्या काठीलाही मग फ़ुटे हसे
घरभर किणकिणे पैंजणांचा नाद
कापर्या आवाजाची काळजीची साद
'मनीचा' असे हट्ट आंबा हवा
थकल्या पावलांना नाही उन्हातही विसावा
नातीची भेट सुट्टीत चार दिवसांची
आजोबांची हीच पुंजी वर्षभराची
नावावर नुसताच नाही केला ठेवा रुपयांचा
नातीला दिला वारसा अनमोल संस्कारांचा
"खुप मोठी हो बाळा" ठेउन डोक्यावरी हात
आजोबा गेले उरला त्यांचा एक फ़ोटो कोपर्यात
आजोळच्या त्या कोपर्यात आता कोळ्याच जाळ लटकलेल
पण त्या इवल्याशा कोपर्यात माझ आभाळ वसलेलं
---वैभवी भिडे
last 4 lines are heart touching. too good
ReplyDelete