Saturday, March 26, 2011

चार क्षण विसाव्याचे
शांततेत पहुडलेले
चार क्षण पाखराचे
आभाळात विहरलेले
चार क्षण गवतफ़ुलाचे
वार्‍यावर डोललेले
चारक्षण पावसाचे
मृदगंधाने दरवळलेले
चार क्षण मातीचे
नवांकुरात रुजलेले
चार क्षण माझे
शब्दात गुंफ़लेले
चार क्षण अज्ञाताचे
कालप्रवाहात सामावलेले
---वैभवी भिडे

No comments:

Post a Comment