Saturday, March 26, 2011

सगळीकडे अंधार काळोख पसरलेला
चंद्रप्रकाशही काळ्या ढगात गोठलेला
वाटे तारकाअक्षरे रेखावी नभपटावर
पण नभपटही काळ्या रात्रीने झाकलेला

सप्तरंग ल्यालेली फ़ुलेही मिटलेली
सतेज हिरवी पाने खोडावर टेकलेली
वाटे चहुबाजुंनी रंगांची उधळण व्हावी
पण प्रत्येक रंगही पूर्ण फ़ुलत लपलेला

खळाळत्या झऱ्याचा काहिसा आवाज थांबलेला
काठावरी जरासा पांथस्थ विसावलेला
वाटे जलतुषारांनी आसमंत चिबं भिजावा
पण थेंबही हळुवार झऱ्यासह चाललेला

साऱ्या स्रुष्टिसमवेत हे शरीरही निजलेले
सर्व जाणिवांच्या पलिकडे पोचलेले
वाटे जगत्या मनास निद्रिस्त जाग्रुत करावे
पण निमिषाने जाग्रुतिसाठी रविकिरण आसुसलेला

No comments:

Post a Comment