असं कधी असतं का तू तुझं नि मी माझं ?
थोडंतरी आपलेपण मिसळतच
तुझ्यातही अन माझ्यातही
लक्षातही येणार नाही इतक्या नकळत
अलगद पसरत जातं
पहिल्या पावसानंतर दरवळणाऱ्या मृदगंधा प्रमाणे
जाणवतही भिनतही अन हवहवस वाटतही
असं काही नसत म्हणतानाही
मनातल्या मनात कळतच आपलं आपल्याला हेच ते हेच ते हेच ते ....
---- वैभवी भिडे

No comments:
Post a Comment