Monday, May 19, 2014

जन्म होताच चिकटली नात्यांची लेबल
मला हवी नको काही न विचारता
दिवसागणिक वाढत गेली कोळ्यांच्या जाळ्याप्रमाणे
आणि मी विचार करत राहिले
किती हा गुंता अनोळखी चेहऱ्यांचा
आपले अस्तित्व झाकोळणारा
रक्तातला एक घटक सारखा म्हणून माझ्याशी नातं सांगू पहाणारा
अन मी मात्र शोधात
माझ्या परिजनांच्या विदौट एनी लेबल्स नात्यांसाठी
-- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment