रात्रीही पेन घेऊन झोपतेस का
एकाने मला विचारला
काय सांगू त्याला
शब्दांनी रात्रीच मला डिवचलं
दिवसभर वाट पहिली
कुणीच नाही आलं
संध्याकाळी देवघरातही त्यांना आळवून पाहिलं
इतके अगाऊ हट्टी त्यांनी रात्रीचं येणं केलं
झोपेला दूर सारून मी पेन हाती धरलं
समजूत त्यांची काढून माझं कवी अवसान गळालं
भेटू पुन्हा कधीतरी हसत त्यांनी म्हंटलं
एका पेनावरून मी एवढं आख्यान रंगवलं
ऐकुन तुम्हीही वाह वा केलं
-- वैभवी भिडे

No comments:
Post a Comment