Monday, May 19, 2014

कितीदा ऋतूनां बदलून झाले
तरी फूल गंधाळते हे उरी

कितीदा ठशांना पुसून झाले
तरी रेष दिसे तळहातावरी

कितीदा ढगांना परतवून झाले
तरी तिन्हीसांज कावरीबावरी

कितीदा प्रश्नांना वगळून झाले
तरी उत्तरे हासती साजिरी

कितीदा नियमांना मोडून झाले
तरी बंदिस्त होते चौकटीभरी

कितीदा भासांना कवळून झाले
तरी माणसे सामोरी खरी
 
-- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment