कुठून कशी येईल लहर
कोण जाणे
तिचा पत्ता विचारायचं धाडस माझ्यात नाही
तिच्या राज्यात मीच सामान्य नागरिक म्हणून रहाते
सगळे कर नियमित भरते
तरी ही असंतुष्टच
असं एखाद दुसऱ्या घोटाने
हीची तहान भागत नाही
हिची धाव कायम सागराकडे
लाटांचं नर्तन नजरेस पडल्याशिवाय
हिचा अवखळपणा शांत होत नाही
मग ती हेलकावत रहाते किनाराभर
जगणं कोळून प्यायलेल्या प्रौढे सारखी
प्रगल्भ
----- वैभवी भिडे
4 July 2014
कोण जाणे
तिचा पत्ता विचारायचं धाडस माझ्यात नाही
तिच्या राज्यात मीच सामान्य नागरिक म्हणून रहाते
सगळे कर नियमित भरते
तरी ही असंतुष्टच
असं एखाद दुसऱ्या घोटाने
हीची तहान भागत नाही
हिची धाव कायम सागराकडे
लाटांचं नर्तन नजरेस पडल्याशिवाय
हिचा अवखळपणा शांत होत नाही
मग ती हेलकावत रहाते किनाराभर
जगणं कोळून प्यायलेल्या प्रौढे सारखी
प्रगल्भ
----- वैभवी भिडे
4 July 2014
No comments:
Post a Comment