Thursday, September 11, 2014

कडे कोसळतायत
दर पावसाळ्यासारखे
मातीची ओढ चिवट असते म्हणतात
मग डोंगरांना आपल्या नाळेशी परतावसं वाटणं
चूक कसं ?
नकोय त्यांना विभक्तपण
बोगाद्यांसोबत येणारं
अविचल असं नामांतरणही नकोसे आहे
मग का हा अट्टाहास
कड्याकपारी मातीत गाडण्याचा
भूगोल शिकवायला हवाय
पृथ्वी गोल आहे

----- वैभवी भिडे

4 July 2014

No comments:

Post a Comment