Thursday, September 11, 2014

मोकळी होते मी तोपर्यंत छान होतं
दिलासा असायचा
आता एक भाग होऊ पाहतेय मी
त्यांच्यातलीच होऊन राहीन कदाचित
अजून अस्पष्टच आहे
म्हणून तर कल्पनेची कास धरलीये
प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हाही
मी अशीच असेन का प्रश्नांकित ?
की पाहू शकेन त्या पल्याड थांबलेली उत्तर ??
कदाचित किनाराही वाट बघत असेल माझ्याच नावेची.

---- वैभवी भिडे

7 July 2014

No comments:

Post a Comment