एका नसेतून रक्ताने यायला नकार दिला
मग दुसरीतून त्याची चोरी केली
वरून चिकट पट्टीने मुस्कटदाबी
परत उसळू नये म्हणून
वर्षानुवर्षे हेच चालू आहे
शेवटचा थेंब संपेपर्यंत
तोवर होईलच जन्म नवीन नसांचा
परत सुरु होईल तीच सळसळ
आणि तिला जगात ओढून आणणारी सुई
असेलच तयार टोक काढत
----- वैभवी भिडे
6 July 2014
मग दुसरीतून त्याची चोरी केली
वरून चिकट पट्टीने मुस्कटदाबी
परत उसळू नये म्हणून
वर्षानुवर्षे हेच चालू आहे
शेवटचा थेंब संपेपर्यंत
तोवर होईलच जन्म नवीन नसांचा
परत सुरु होईल तीच सळसळ
आणि तिला जगात ओढून आणणारी सुई
असेलच तयार टोक काढत
----- वैभवी भिडे
6 July 2014
No comments:
Post a Comment