Thursday, September 11, 2014

दिशांना सापडायला वेळ नाही
तोवर मनसोक्त भरकटून घ्या
तसंही कुठे आपण नियमात बसतो
आता तर आंदण मिळालंय
मग घ्या उधळून
होतं का तुमच्या हातात
पर्याय निवडणं ?
मग काय फरक पडला
आताही सगळं घडतंय
त्याच क्रमाने
तुम्ही फक्त कोसळत रहा
तसेच तळहीन खोलात
अनिश्चित वेगात
कदाचित आस कलला
तर एखादी बाजू हाताशी लागेलही

----- वैभवी भिडे

12 July 2014

No comments:

Post a Comment