Thursday, September 11, 2014

आज जरा पावसाने दडी मारली
सूर्यदर्शन झालं नाहीच
पण उकाड्याने त्याच्या
अस्तित्वाची जाणीव करून दिली
                             
                                     
इकडचं तिकडचं बोलत
व्हाटसप वर टीपी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला
तरीही मनाला आलेली मरगळ
तशीच चिकटून राहिली

ठरवून टाकलं विचार करायचा नाही
मग हटकून सगळ्या प्रॉब्लेम्सनी समोर हजेरी लावली
त्यांच्या गर्दीत वेळ कधी गेला
कळलंच नाही
तेवढाच एक दिवस ढकलला गेला

रविवार आला ! विश्वास नाही बसत
दुपारी ताणून देतेय तोच अर्धा संपला
रात्रही  जरा छोटीच होती
थोडा रेंगाळला असता रविवार
तर काही बिघडलं असतं

हे असंच असतं ना आपलं
आठवड्याभराचं टाइमटेबल
दिवस वर खाली सरकवत
रुटीन ब्रेक करायला हवंय
थोडासा इंटरेस्ट मिक्स करत 
चेंज म्हणून तरी

----- वैभवी भिडे 
 
21 July 2014

No comments:

Post a Comment