Thursday, September 11, 2014

कळत नाहीत ही वळणे आली कुठून
कधीकाळी हा रस्ता सुखकर होता
प्रवासासाठी
आताशा अचंबित करतात सगळेच 
रस्ते आपल्या अनपेक्षित वळणांनी
सरळसोट रस्ता तरी कुठे असतो
पण थोडा माहितीचा असेल तर
बिचकण कमी होतं
बाकी चालणं आता सवयीचा भाग होऊन गेलंय
खाचखळग्यांच्या सोबतीने
आता या रस्त्यांना आवर घातला पाहिजे
वळणांच्या मोहपाशापासून

---- वैभवी भिडे

7 July 2014

No comments:

Post a Comment