इतके विभिन्न अर्थ धुंडाळणं
जमेल असं वाटत नाही
सहज सोपे प्रयत्नच
माझ्या तळहातावर कोरलेत
त्यांच्या सोबतच होणार माझा उदयास्त
मान्य आहेत मला त्यांच्या अटी
विनातक्रार
कारण ती करणार कुठे अन कुणा विरुद्ध ?
भव्य शिल्प घडवणं नसेल जमत त्यांना
पण त्या लिहीतील
" शिलालेख "
इतिहासाला वर्तमानात आणून भविष्याशी जोडणारा
---- वैभवी भिडे
जमेल असं वाटत नाही
सहज सोपे प्रयत्नच
माझ्या तळहातावर कोरलेत
त्यांच्या सोबतच होणार माझा उदयास्त
मान्य आहेत मला त्यांच्या अटी
विनातक्रार
कारण ती करणार कुठे अन कुणा विरुद्ध ?
भव्य शिल्प घडवणं नसेल जमत त्यांना
पण त्या लिहीतील
" शिलालेख "
---- वैभवी भिडे
12 July 2014
No comments:
Post a Comment