Thursday, September 11, 2014

मला सोस नाही इथे रमण्याचा
वाट चुकले बहुदा
म्हणून आढळते इथे
सदा न कदा परकी बनून                              
                               
पारखेपण उपेक्षा
रोज रडगाणं गातात समोर
तरीही मी निर्विकारच
सुरकुतीही माझ्यातली हलू न देता

वाटयाला काय आलंय हे
मोजणं जमलं असतं
तर मी ही ' तज्ञ ' गणली गेले असते
वजा झालेल्या उत्तरांना
पण अधिक प्रश्न विचारणं
बरं दिसलं नसतं

म्हणून मी आहे अजूनही इथेच
काहीच नसतानाही काही असल्यासारखी
पुढे मागे जाईनही माझा मुलुख शोधायला
पण तूर्तास दिवस शिल्लक आहेत
त्यांचा गुणाकार मात्र थांबलाय
आता माझी सारी भिस्त भागकारावरच

----- वैभवी भिडे 
 
15 July 2014

No comments:

Post a Comment