खुपदा चकवतो आपण एकमेकींना
भेट टाळण्यासाठी
हजार बहाणे आपले
बहुतेक वेळा अयशस्वी
मग तो सदाबहार आमनासामना
बघणाऱ्याला वाटत विजा कडकडतायत
पण आपण मात्र गर्क वादळमिठीत
कित्येक वर्षांचे साचलेपण झोकून देऊन
पुन्हा अनोळखी होण्यासाठी
कागदाची उगीच तक्रार शाई उडवलीन पोरींनी
नजरेत येतांत गं आपल्या भेटी
पुढच्यावेळी वेश बदलून भेटूयात म्हणतेय
----- वैभवी भिडे
23 July 2014
भेट टाळण्यासाठी
हजार बहाणे आपले
बहुतेक वेळा अयशस्वी
मग तो सदाबहार आमनासामना
बघणाऱ्याला वाटत विजा कडकडतायत
पण आपण मात्र गर्क वादळमिठीत
कित्येक वर्षांचे साचलेपण झोकून देऊन
पुन्हा अनोळखी होण्यासाठी
कागदाची उगीच तक्रार शाई उडवलीन पोरींनी
नजरेत येतांत गं आपल्या भेटी
पुढच्यावेळी वेश बदलून भेटूयात म्हणतेय
----- वैभवी भिडे
23 July 2014
No comments:
Post a Comment