Thursday, September 11, 2014

वास्तवाशी फारकत घेऊन
आभासात रमणे
याला संतुलन ढळणे म्हणतात
रूढ समजुतीने
कमकुवत, अपयशी असेच काही
समानार्थी शब्द
त्यांच्यासाठी वेगळ्या बंद खोल्या
भास जोपासता येतील अशा
जागाही ठराविक उरलेलं वाढावं तशा
कुंपणाचं अंतर नीट राखून
इतर रममाण समाजमान्य भासमान वास्तवात
पण हीसुद्धा एक मनोवस्थाच
अल्याड पल्याड वावरणारी

----- वैभवी भिडे

8 July 2014

No comments:

Post a Comment