एखादं प्रकरण मुरत ठेवणं
तसं जमत नाही
पण यावेळी लांबलय हे खरं
मग आता देखभाल करणं आलं ओघानेच
निगा राखणंही
ओलसर हवेत बुरशी चढू नये म्हणून
उन्हं आलीच तर दाखवावी लागतात
चवीत फरक पडतो म्हणे
काय काय नी कसले कसले उपाय
आधी कधी नव्हतं वाटलं
इतकी ताकद लावावीशी
मग आताच का
बरणीत नेमकं काय लोणचं
की मुरंबा ?
पावसाळ्यानंतर कळेल बहुदा
छुंदा झाला नाही म्हणजे मिळवलं
----- वैभवी भिडे
22 July 2014
तसं जमत नाही
पण यावेळी लांबलय हे खरं
मग आता देखभाल करणं आलं ओघानेच
निगा राखणंही
ओलसर हवेत बुरशी चढू नये म्हणून
उन्हं आलीच तर दाखवावी लागतात
चवीत फरक पडतो म्हणे
काय काय नी कसले कसले उपाय
आधी कधी नव्हतं वाटलं
इतकी ताकद लावावीशी
मग आताच का
बरणीत नेमकं काय लोणचं
की मुरंबा ?
पावसाळ्यानंतर कळेल बहुदा
छुंदा झाला नाही म्हणजे मिळवलं
----- वैभवी भिडे
22 July 2014
No comments:
Post a Comment