कुठलाच धागा सुईत ओवला जाऊ नये
नजर इतकी कमजोर व्हावी
की सुईतच जागा शिल्लक नाहीये
धाग्याला स्वतःत ओवून घ्यायला
नजर इतकी कमजोर व्हावी
की सुईतच जागा शिल्लक नाहीये
धाग्याला स्वतःत ओवून घ्यायला
मग आता फुलांचं काय
हाराशिवायच निर्माल्य बनायचं ?
एक दिवसाचं आयुष्य मिळालेलं
तर आता तेही केरात
हाराशिवायच निर्माल्य बनायचं ?
एक दिवसाचं आयुष्य मिळालेलं
तर आता तेही केरात
काही जन्म असेच असतात
सुरु होतानाच संपलेले
अर्थ निरर्थकाच्या मधे
दोलायमान
तरीही बिया पेरायला हव्या
जिथे जाऊ तिथे
सुरु होतानाच संपलेले
अर्थ निरर्थकाच्या मधे
दोलायमान
तरीही बिया पेरायला हव्या
जिथे जाऊ तिथे
जेव्हा हारांचे स्तोम संपेल
तेव्हा शोध घेतला जाईल फुलांचा
फुलण्याचा खरा सोहळा तेव्हाच सुरु होईल
जग पुन्हा नटेल विविधतेतून एकतेत
तेव्हा शोध घेतला जाईल फुलांचा
फुलण्याचा खरा सोहळा तेव्हाच सुरु होईल
जग पुन्हा नटेल विविधतेतून एकतेत
---- वैभवी भिडे
18 July 2014
No comments:
Post a Comment