Thursday, September 11, 2014

गहाळ होऊनही मी पुन्हा सापडू शकेन
अशी खूण मागे ठेवायला हवी
माझ्यासाठीच
स्मरणशक्तीवर विसंबून रहाण
पटत नाही
आणि तिच्यावर किती ओझं लादायचं
शेवरीगत थोडं हलकंफुलकं वावरुदेत तिला
न जाणो एखाद्या स्मृतीने तिचेही पाय जडावतील
संख्या वाढेल एकदम मान्य
पण किमान ती निरर्थक गर्दी नसेल

----- वैभवी भिडे

14 July 2014

No comments:

Post a Comment