कधी चुकून पायाशी हुळहुळलं
तरी दचकायला होतं
केवढी खोलवर रुजलीये जाणिव
संकटांच्या मुशीत घडलेली
एखादं सुखही येऊ शकतं पायाशी
चुकून सुद्धा विचार येत नाही
नसण्याची सवय फार चिवट असते बरं
तिने एकदा कुठे मुक्काम केला
कि तोच घरोबा
तोडत जायची वाईट सवय तिला नाही
तिला फक्त सोबत येणं कळत
खरा वाद सुरु होतो सवत आली कि
ती जागी करते झोपी गेलेल्या स्वप्नांना
आणि खात्री देते नव्या जगाची
आपण मात्र गोंधळून उभे
निर्णयाच्या निसरड्या पुलावर
शक्य अशक्यतेच्या दाट धुक्यात
सूर्याची वाट बघण्यात अर्थ नाही
हे जरा लवकर कळले असते तर ?
----- वैभवी भिडे
20 July 2014
तरी दचकायला होतं
केवढी खोलवर रुजलीये जाणिव
संकटांच्या मुशीत घडलेली
एखादं सुखही येऊ शकतं पायाशी
चुकून सुद्धा विचार येत नाही
नसण्याची सवय फार चिवट असते बरं
तिने एकदा कुठे मुक्काम केला
कि तोच घरोबा
तोडत जायची वाईट सवय तिला नाही
तिला फक्त सोबत येणं कळत
खरा वाद सुरु होतो सवत आली कि
ती जागी करते झोपी गेलेल्या स्वप्नांना
आणि खात्री देते नव्या जगाची
आपण मात्र गोंधळून उभे
निर्णयाच्या निसरड्या पुलावर
शक्य अशक्यतेच्या दाट धुक्यात
सूर्याची वाट बघण्यात अर्थ नाही
हे जरा लवकर कळले असते तर ?
----- वैभवी भिडे
20 July 2014
wah zakkas
ReplyDeletewah zakkas
ReplyDelete