Friday, July 4, 2014

रोज ठरवते मी नव काहीतरी लिहायचं 
किमान वेगळ्या ढंगाने तरी 
पण काय सुचेल नेम नसतो 
प्रत्येक डे सेम नसतो 
काल उन्हाळा सुरु होता 
आज पाउस कोसळत असतो 
कोरडी होतेय वाटतानाच 
ओलेपण खुणवत येतं 
सैरावैरा धावताना 
किती नि काय काय सापडत जातं 
चिमटीत धरू म्हणताच 
फुलपाखरू आकाशात फ्लाय करतं 
रुसण्याचा आव माझा 
अस्सल खरेपणाने वठतो 
नाकाचा शेंडाही एकदम रेड रेड होतो 
मधेच फुटतं हसू 
अन दुःख सगळं गळून पडतं 
असंच काहीसं लिहीत लिहीत
मूड पटकन चेंज होतो 
तेच तेच असूनही 
आपसूक डिफरंट फिल होतं 

----- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment