त्याचा अस्त सुरु झालाय
पर्यायच नव्हता म्हणा
जातानाही त्याने आकाश रंगवलच
आयुष्यभर इमान राखलं
आता तरी कसं विसरणार कर्तव्याला
काही वेडे असेच असतात
ध्यासाने पछाडलेले
जात कूळ धर्म म्हणून
कर्तव्यच जगतात
विसरून जगरहाटी
कळतच नाही त्यांना
चिमुटभर मातीसाठी भांडणाऱ्या जमाती
आसपास रेषांचा गुंतवळ घेऊन
अडकून राहिलेली माणसं
धक्का बसतो त्यांना
असे तुकडे बघून त्यांच्या अखंड विश्वाचे
विश्वास उडतो स्वतःच्या माणूसपणावरचा
आणि तिथून ओढ जन्म घेते अस्ताची
आसपासच्या पुतळ्यांचं असंच काहीसं चरित्र असेल नाही का ??
---- वैभवी भिडे
पर्यायच नव्हता म्हणा
जातानाही त्याने आकाश रंगवलच
आयुष्यभर इमान राखलं
आता तरी कसं विसरणार कर्तव्याला
काही वेडे असेच असतात
ध्यासाने पछाडलेले
जात कूळ धर्म म्हणून
कर्तव्यच जगतात
विसरून जगरहाटी
कळतच नाही त्यांना
चिमुटभर मातीसाठी भांडणाऱ्या जमाती
आसपास रेषांचा गुंतवळ घेऊन
अडकून राहिलेली माणसं
धक्का बसतो त्यांना
असे तुकडे बघून त्यांच्या अखंड विश्वाचे
विश्वास उडतो स्वतःच्या माणूसपणावरचा
आणि तिथून ओढ जन्म घेते अस्ताची
आसपासच्या पुतळ्यांचं असंच काहीसं चरित्र असेल नाही का ??
---- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment