ट्रेन लेट नेहमी प्रमाणेच
खचाखच गर्दी नेहमी प्रमाणेच
माझा त्रागा इतरां सारखाच
रेल्वे चा खेद नेहमी प्रमाणेच
मग एखादा सामोसा, सुखी भेळ ,
पाण्याच्या साठ्याचा काळजीपूर्वक वापर
दोनचार कुरमुरे तोंडात टाकत
नजरेनेच जोखायचं
आत शिरण्या एवढी फट कशी निर्माण होईल
या फटीचं अपरंपार महात्म्य आहे
आम्हा लोकलवासियांसाठी
रोज सकाळ संध्याकाळ यावर
आमची शास्त्रज्ञ डोकी नवीन उपाय शोधत असतात
एकदा का फट ओलांडली की स्वर्गप्राप्ती
मग आम्हीही झोडतो चर्चासत्रं
दरवाजात लोंब कळणाऱ्याच्या सुरक्षेवर
परदेशांचे दाखले देत
आपला देश इम्परफेक्ट कसा
हे बहुमताने ठरतं त्या घामट गर्दीत
स्टेशन आलं की आतून बाहेर
अडकत,खरंचटत,तोडत मोडत
भूमिकेची अदलाबदल
आतल्या नरकाला बोल लावत
पायऱ्या चढते बाहेर जाणाऱ्या
विसरून जाते धकाधकीत
माझं परफेक्ट स्वप्न
ट्रेन मधल्या विंडोसीटचं
----- वैभवी भिडे
खचाखच गर्दी नेहमी प्रमाणेच
माझा त्रागा इतरां सारखाच
रेल्वे चा खेद नेहमी प्रमाणेच
मग एखादा सामोसा, सुखी भेळ ,
पाण्याच्या साठ्याचा काळजीपूर्वक वापर
दोनचार कुरमुरे तोंडात टाकत
नजरेनेच जोखायचं
आत शिरण्या एवढी फट कशी निर्माण होईल
या फटीचं अपरंपार महात्म्य आहे
आम्हा लोकलवासियांसाठी
रोज सकाळ संध्याकाळ यावर
आमची शास्त्रज्ञ डोकी नवीन उपाय शोधत असतात
एकदा का फट ओलांडली की स्वर्गप्राप्ती
मग आम्हीही झोडतो चर्चासत्रं
दरवाजात लोंब कळणाऱ्याच्या सुरक्षेवर
परदेशांचे दाखले देत
आपला देश इम्परफेक्ट कसा
हे बहुमताने ठरतं त्या घामट गर्दीत
स्टेशन आलं की आतून बाहेर
अडकत,खरंचटत,तोडत मोडत
भूमिकेची अदलाबदल
आतल्या नरकाला बोल लावत
पायऱ्या चढते बाहेर जाणाऱ्या
विसरून जाते धकाधकीत
माझं परफेक्ट स्वप्न
ट्रेन मधल्या विंडोसीटचं
----- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment