Friday, July 4, 2014

असं कसं समजवायचं 
कृतीतून उमटणाऱ्या अर्थांना 
स्वताःही मेहनत करावी कधीतरी 
उमजून घेण्यासाठी 
नाहीतर सरळ शब्दांचा मार्ग चोखंदळावा 
ती खाणाखुणांची भानगड नको 
पण मग वंचित रहा 
तक्रार करू नका काहीतरी कमी आहे म्हणून 
नाहीतर सजग व्हा आणि गुंतून जा 
या मायाजालात 
पुन्हा पुन्हा अडकण्यासाठी 

----- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment