तू असाच बरस मुसळधार
खंड न पाडता
तोवर जोपर्यंत
एकेक ओरखडा वाहून
सागरात विसर्जित होत नाही
पाटी वर झालेली अक्षरांची गिचमिडही
पुसून टाक
काळाला गिरवू देत " अ आ इ "
खूप दिवस बाळगलं हे अडाणीपणाचं ओझं
आता तू हा भार हलका कर शिरावरून
अखंड अभिषेकाने
हलाहलाची दाहकता
कळू देत सर्वांगाला
जाणवू देत विरोधाभास
सृजन अन विनाशातला
तेव्हाच ज्ञान मिळेल
महादेव " स्वयंभू " असावा लागतो
----- वैभवी भिडे
खंड न पाडता
तोवर जोपर्यंत
एकेक ओरखडा वाहून
सागरात विसर्जित होत नाही
पाटी वर झालेली अक्षरांची गिचमिडही
पुसून टाक
काळाला गिरवू देत " अ आ इ "
खूप दिवस बाळगलं हे अडाणीपणाचं ओझं
आता तू हा भार हलका कर शिरावरून
अखंड अभिषेकाने
हलाहलाची दाहकता
कळू देत सर्वांगाला
जाणवू देत विरोधाभास
सृजन अन विनाशातला
तेव्हाच ज्ञान मिळेल
महादेव " स्वयंभू " असावा लागतो
----- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment