Friday, July 4, 2014

कळत नाहीत चुकार थेंब 
ओघळले कसे या अंगणात 
जे झाकोळलं होतं अडगळीच्या गर्दीने 
विसरून गेलेलं नातं उजेडाशी 
पाउस तर दूरंच 
पण या थेंबानी पाहिलंच आत शिरून 
औत्सुक्याने 
त्यांच्या ओघाळाने 
उमटलीये रेषा धुळीतून माग काढत 
आता रेषेचं गंतव्य स्थान कुठे 
ते अनिश्चित आहे 
पण अंगणाला जाग आलीये 
या ओलाव्याने 
काहीतरी घडणार लवकरच 

---- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment