तुझ्या गावात त्या नंतरही मी कित्येकदा आले
स्वागताचे भव्य सोहळेही झाले
पण त्यात ते दोन शब्दांचं गहिरेपण नव्हतं
" स्वागत असो "
आल्यावर माझे डोळे कायम भिरभिरत राहिले
तू तिथे नाही हे माहित असूनही
सवयीचा परिणाम
खूप फिरले मी
पण तुझ्या सोबत एक रस्ताही न बघू शकल्याचे शल्य मनात बाळगून
आज पुन्हा येउन गेले तिथे
स्वागताविनाच
कारण आता मीही या " गावचीच " झालेय
कधी समोर दिसलास तर मीही म्हणून जाईन नकळत
" स्वागत असो "
----- वैभवी भिडे
स्वागताचे भव्य सोहळेही झाले
पण त्यात ते दोन शब्दांचं गहिरेपण नव्हतं
" स्वागत असो "
आल्यावर माझे डोळे कायम भिरभिरत राहिले
तू तिथे नाही हे माहित असूनही
सवयीचा परिणाम
खूप फिरले मी
पण तुझ्या सोबत एक रस्ताही न बघू शकल्याचे शल्य मनात बाळगून
आज पुन्हा येउन गेले तिथे
स्वागताविनाच
कारण आता मीही या " गावचीच " झालेय
कधी समोर दिसलास तर मीही म्हणून जाईन नकळत
" स्वागत असो "
----- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment