गाव बदलताना मी
पावसाला गाठीस बांधून घेतलंय
नव्या ठिकाणी कोणी आपलं सोबत असावं ना
वातावरण अनोळखी असलं
तरी मला आवडतो तो नवा कोरा सुवास
नवी पुस्तकं आणल्यावर येतो न तस्सा
त्यात थोडा माझा पाऊस शिंपडेन म्हणतेय
मोगरा मिसळलेला
गावभर रुजेल मग सुगंध
तेवढाच काय तो ठसा माझ्या अस्तित्वाचा
हे गाव सोडताना
---- वैभवी भिडे
पावसाला गाठीस बांधून घेतलंय
नव्या ठिकाणी कोणी आपलं सोबत असावं ना
वातावरण अनोळखी असलं
तरी मला आवडतो तो नवा कोरा सुवास
नवी पुस्तकं आणल्यावर येतो न तस्सा
त्यात थोडा माझा पाऊस शिंपडेन म्हणतेय
मोगरा मिसळलेला
गावभर रुजेल मग सुगंध
तेवढाच काय तो ठसा माझ्या अस्तित्वाचा
हे गाव सोडताना
---- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment