प्रचंड कोलाहल आहे
कानात अन मनात ...
दुरवरुन येणारे ते आवाज
लक्ष वेधुन घेतातच
कामं बाजूला टाकुन
मी ऐकत रहाते
विचार अन भावनांचे
ते वाद प्रतिवाद
सगळेच बरोबर
मग आपण कुठल्या बाजुला झुकायचे
मग आवाज अजुन चढत जातात
पार टिपेपर्यंत
त्यासोबतच आपली हतबलताही
हात कनावर ठेउन ओरडु का?
' बस्स कर शांत रहा '
दचकुन जाग येते
आपणच आपल्याला शांत करु पहातोय आपल्यापासुन ??
इतकं कसं गंभीर झालं सगळं
पुन्हा नव्याने वेढलं मला
अंतर्मुखतेनं
आपसुक शांत झालेय मी
कोलाहलात गढल्याने
---- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment