Friday, July 4, 2014

माझ्या भात्यात आहेत कैक काटे 
काहींनी क्षण दुखावलेत 
काहींनी मान तर काहींनी स्वाभिमान 
काही जण इतके बेरकी की 
भावनांचे थर फाडून खोल घुसलेयत 
जन्मठेपेची शिक्षा असल्यासारखे 
तसे काही एकदम हलकेफुलके 
नुसते खरचटण्या पुरते 
काही तर मोडून पडले 
एक ओरखडा उमटवून 
काहींचा नुसताच खळखळाट 
कातरवेळी घालमेल वाढवत 
तरीही माझा " गुलाब " सुरक्षित आहे 
काट्यांच्या जागत्या पहाऱ्यात 
अधिकाधिक " टवटवीत " 

----- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment