आजकाल संध्याकाळ निवांत भेटते मला
हलकासा पावसाचा शिडकावा
गारेगार वारा
ट्रेन मध्ये कधिमधे चक्क विंडो सीट
आणि स्मार्ट फोनच्या अप्लिकेशन मध्ये
सराईतपणे टाईप होणारे " मुक्तछंदा "
एक रुटीन होऊन बसलंय
माझ्यातले असे एक एक प्रहर सुटे झालेत
प्रत्येकाशी नवीनच ओळख होतेय
कशाला त्यात जुने संदर्भ वापरू
नुकतंच नवीन कव्हर घातलंय मी
माझ्या जगण्याला
जून महिना सुरु झाला तर
----- वैभवी भिडे
हलकासा पावसाचा शिडकावा
गारेगार वारा
ट्रेन मध्ये कधिमधे चक्क विंडो सीट
आणि स्मार्ट फोनच्या अप्लिकेशन मध्ये
सराईतपणे टाईप होणारे " मुक्तछंदा "
एक रुटीन होऊन बसलंय
माझ्यातले असे एक एक प्रहर सुटे झालेत
प्रत्येकाशी नवीनच ओळख होतेय
कशाला त्यात जुने संदर्भ वापरू
नुकतंच नवीन कव्हर घातलंय मी
माझ्या जगण्याला
जून महिना सुरु झाला तर
----- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment