एक एक पाकळीने मिटून घ्यावे
आपले रंग अन गंध
ठेवू नये एकही संदर्भ मागे
फुलण्याचा
झाकली मूठ सव्वा लाखाची
मग दडवून ठेवा सगळं बंद करून मूठ
वाट बघा जगाच्या कोमेजण्याची
मिळालीच जर क्षमा
तर खुली करेनही चिरंतन सत्यं
एक कळी ल्यालेलं रोप देऊन
तिच्या फुलण्याची शाश्वती न देता
---- वैभवी भिडे
आपले रंग अन गंध
ठेवू नये एकही संदर्भ मागे
फुलण्याचा
झाकली मूठ सव्वा लाखाची
मग दडवून ठेवा सगळं बंद करून मूठ
वाट बघा जगाच्या कोमेजण्याची
मिळालीच जर क्षमा
तर खुली करेनही चिरंतन सत्यं
एक कळी ल्यालेलं रोप देऊन
तिच्या फुलण्याची शाश्वती न देता
---- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment