छानसं आखिव रेखीव सुचलं पाहिजे
गोल गोल नक्षीदार
तलम अन अलवार
फुलपाखरू अन फुलांशी जोडता आलं पाहिजे
टपोरं मोतिया
पाचू अन कोंदणी हिरा
रत्नजडीत जगात झळकत राहिलं पाहिजे
पाऊस हवा पण नकोत गारा
भिजणं हवं नको तो शहारा
सगळं कसं पहिलवहिल पाहिजे
मृदगंधाने कायम दरवळत रहायचं
त्यासाठी पावसाने रोज पहिलं यायचं
त्याने दोन थेंबांनी इथेच बरसायचं
चुकुनही खड्ड्यात नाही स्वतःस भरायचं
आसपास छान हिरवगार हवं
भलेतर शेवाळाने परदेशी जावं
आमच्या इथे कायम फुलबागच पाहिजे
रोज तुम्ही त्यावर मधाळ लिहीलं पाहिजे
नाहीच जमणार म्हणत आयुष्य डोकावलं
दिवस्वप्नास हलवून जागं करून गेलं
चला आता कागदांना गोळा केलं पाहिजे
जे जसं असतं तेच लिहिलं पाहिजे
बघा आता कसं मोकळं वाटेल
नजरेत मनाचं प्रतिबिंब दिसेल
खरंतर जगताही असंच आलं पाहिजे
चेहऱ्यातून माणसाचा तळ दिसला पाहिजे
---- वैभवी भिडे
गोल गोल नक्षीदार
तलम अन अलवार
फुलपाखरू अन फुलांशी जोडता आलं पाहिजे
टपोरं मोतिया
पाचू अन कोंदणी हिरा
रत्नजडीत जगात झळकत राहिलं पाहिजे
पाऊस हवा पण नकोत गारा
भिजणं हवं नको तो शहारा
सगळं कसं पहिलवहिल पाहिजे
मृदगंधाने कायम दरवळत रहायचं
त्यासाठी पावसाने रोज पहिलं यायचं
त्याने दोन थेंबांनी इथेच बरसायचं
चुकुनही खड्ड्यात नाही स्वतःस भरायचं
आसपास छान हिरवगार हवं
भलेतर शेवाळाने परदेशी जावं
आमच्या इथे कायम फुलबागच पाहिजे
रोज तुम्ही त्यावर मधाळ लिहीलं पाहिजे
नाहीच जमणार म्हणत आयुष्य डोकावलं
दिवस्वप्नास हलवून जागं करून गेलं
चला आता कागदांना गोळा केलं पाहिजे
जे जसं असतं तेच लिहिलं पाहिजे
बघा आता कसं मोकळं वाटेल
नजरेत मनाचं प्रतिबिंब दिसेल
खरंतर जगताही असंच आलं पाहिजे
चेहऱ्यातून माणसाचा तळ दिसला पाहिजे
---- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment