भरलेलं ताट समोर असताना
ते सुबकतेने खाणं
ही पण एक कला आहे
मग हात कोणताही असो
डावा वा उजवा
एक एक पदार्थ
निरनिराळ्या स्वभावाचा
ताट भरून राहिलेला
कोणालाही न डावलता
घास अन घास चाखताना
करणाऱ्याचं मन जाणता येतं
ओठातून पोटात अन तिथून
साऱ्या शरीरभर
ताट रिकामा होऊनही
मागे उरू द्यावी
तृप्ततेची नक्षी
उष्टी खरकटी ताट उचलणाऱ्या हातांसाठी
तेव्हाच खऱ्या अर्थाने लाभतं
अन्नाला पूर्णब्रम्हत्व
----- वैभवी भिडे
ते सुबकतेने खाणं
ही पण एक कला आहे
मग हात कोणताही असो
डावा वा उजवा
एक एक पदार्थ
निरनिराळ्या स्वभावाचा
ताट भरून राहिलेला
कोणालाही न डावलता
घास अन घास चाखताना
करणाऱ्याचं मन जाणता येतं
ओठातून पोटात अन तिथून
साऱ्या शरीरभर
ताट रिकामा होऊनही
मागे उरू द्यावी
तृप्ततेची नक्षी
उष्टी खरकटी ताट उचलणाऱ्या हातांसाठी
तेव्हाच खऱ्या अर्थाने लाभतं
अन्नाला पूर्णब्रम्हत्व
----- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment