या रस्त्यांना भरकटणे माहीत नाही ते मग्न असतात त्यांच्या सरळसोटपणात
कुठेही नजर वाकडी न वळवता
म्हणून तर चालणारे त्यांना वागवतात पाळीव असल्यासारखे
कधी डांबर तर कधी खडी ची दोरी गळ्यात अडकवून
पण कधी तरी होऊ शकतो यल्गार
आणि लागेल निकाल माणसांच्या विरुद्ध
अन उरणार नाहीत दिशा सुद्धा भरकटायला...
---- वैभवी भिडे