Wednesday, May 25, 2011

कई दिनोसे दिलमे अजीबसी हलचल है
कुछ है उसके पास मुझे देने के लिये

एक रुनझुनता शोर है
ता-उम्र सुकुत के लिये

कुछ रंगभरे अल्फ़ाज़
बेकरार है कागज़ पे उतरने के लिये

कचे-पक्के रेशमी धागे
पुरी दुनिया बुनने के लिये

कुछ सादगी भरे सुर है
बाँसुरी मै समाने के लिये

एक हरभरा मौसम
गुलमोहर से खिलने के लिये

और एक साँवरा रंग है
मुझे दिवानी बनाने के लिये

Saturday, March 26, 2011

चंद खामोश पलोकी जरुरत

चंद खामोश पलोकी जरुरत
आवाजोकी इस भीड मैं
कितने सारे आवाज
ख्वाहिशोके ख्वाबोके
हसरतोके चाहतोके
टुटे दिलोके
सिसकती धडकनोके
बंद होते दरवाजोके
झॉकती खिड्कीयोंके
कितने सारे आवाज
पतझडके पत्तोके
बहारकी फ़ुलोके
उनपर मंडराते भॅवरोके
कितने सारे आवाज
डुबती नैयाके
तैरते माझीके
किनरोसे लौटति हुइ लहरोके
कितने सारे आवाज
छुटे हुए लम्होके
उगनेवली नैइ लकिरोके
कितने सारे आवाज
चंद खामोश पलोकी जरुरत
आनेवली नयी सदॉए सुननेके लिए
कभी किसीसे निगाहे लडाके तो देखो
ये हसीं खता एक बार करके तो देखो
बातें तो हज़ार होती है
पर कभी निगाहो की जबाँसे कुछ कहके तो देखॊ।
कुछ एहसास अनकहेसे
कुछ बाते अनकहीसी
कुछ अरमान अनकहेसे
कुछ साँसे अनकहीसी
कुछ लम्हे अनकहेसे
कुछ वादे अनकहेसे
कुछ फ़रीयादे अनकहीसी
कुछ जिंदगी अनकहीसी

---वैभवी भिडे

कोपरा

एक इवलासा कोपरा माझ्या मनात लपलेला
आठवणींचा इंद्रधनु रंग त्यावर सजलेला

दुडुदुडु धावणार्‍या पावलांचे ठसे
म्हातार्‍या काठीलाही मग फ़ुटे हसे

घरभर किणकिणे पैंजणांचा नाद
कापर्‍या आवाजाची काळजीची साद

'मनीचा' असे हट्ट आंबा हवा
थकल्या पावलांना नाही उन्हातही विसावा

नातीची भेट सुट्टीत चार दिवसांची
आजोबांची हीच पुंजी वर्षभराची

नावावर नुसताच नाही केला ठेवा रुपयांचा
नातीला दिला वारसा अनमोल संस्कारांचा

"खुप मोठी हो बाळा" ठेउन डोक्यावरी हात
आजोबा गेले उरला त्यांचा एक फ़ोटो कोपर्‍यात

आजोळच्या त्या कोपर्‍यात आता कोळ्याच जाळ लटकलेल
पण त्या इवल्याशा कोपर्‍यात माझ आभाळ वसलेलं

---वैभवी भिडे
चार क्षण विसाव्याचे
शांततेत पहुडलेले
चार क्षण पाखराचे
आभाळात विहरलेले
चार क्षण गवतफ़ुलाचे
वार्‍यावर डोललेले
चारक्षण पावसाचे
मृदगंधाने दरवळलेले
चार क्षण मातीचे
नवांकुरात रुजलेले
चार क्षण माझे
शब्दात गुंफ़लेले
चार क्षण अज्ञाताचे
कालप्रवाहात सामावलेले
---वैभवी भिडे
समोर सगळा अंधार प्रकाश कायम हरवलेला
मार्ग कसा सापडणार इच्छांचा दिवाच विझलेला
कसला वसंत कुठल्या पाकळ्या काटा पायात रुतलेला
दिसतोय रस्ता सरळसोट डोळा फाट्यांमधे गुंतलेला
सारे म्हणतात कविता मी शब्दांचा पसारा मांडलेला

वैभवी भिडे
सगळीकडे अंधार काळोख पसरलेला
चंद्रप्रकाशही काळ्या ढगात गोठलेला
वाटे तारकाअक्षरे रेखावी नभपटावर
पण नभपटही काळ्या रात्रीने झाकलेला

सप्तरंग ल्यालेली फ़ुलेही मिटलेली
सतेज हिरवी पाने खोडावर टेकलेली
वाटे चहुबाजुंनी रंगांची उधळण व्हावी
पण प्रत्येक रंगही पूर्ण फ़ुलत लपलेला

खळाळत्या झऱ्याचा काहिसा आवाज थांबलेला
काठावरी जरासा पांथस्थ विसावलेला
वाटे जलतुषारांनी आसमंत चिबं भिजावा
पण थेंबही हळुवार झऱ्यासह चाललेला

साऱ्या स्रुष्टिसमवेत हे शरीरही निजलेले
सर्व जाणिवांच्या पलिकडे पोचलेले
वाटे जगत्या मनास निद्रिस्त जाग्रुत करावे
पण निमिषाने जाग्रुतिसाठी रविकिरण आसुसलेला

पाउस

तेव्हा वाटला होतं हा पाऊस कसा रिमझिम बरसतोय
प्रत्येक थेंबातून एक नवे गाणे आपल्यासाठीच रचतोय
आता मात्र हा पाऊस धो धो कोसळतोय
का तू नसल्याचे दु:ख रडून हलके करतोय?

तेव्हा वाटल होतं हा पाऊस कसा खुद्कन हसतोय
आपल्या नात्याचे मनापासून स्वागत करतोय
आता मात्र हा पाऊस उगाचच येतोय जातोय
का नाते संपल्याची खात्री करु पहातोय

तेव्हा वाटायच हा पाऊस कसा नक्षीदार पडतोय
तुझे माझे नाते मोत्यांच्या राशिनी सजवतोय
आता मात्र हा पाऊस कसा वेडावाकडा येतोय
का विखुरलेल्या मोत्यांना पुन्हा सांधु पहातोय

तो उनाड पाऊसही आता थकला भागला
वयाबरोबर तोही आता पोक्त होऊ लागला
या अखेरच्या वाटेवर तुझा हातही हातातून निसटला
तेव्हा काय आता काय पाउस मुकपणे मला साथ करीत रहिला

वैभवी भिडे