मला ना माझा कॅनव्हास किंचित मोठा करायचाय
त्याच्या क्षेत्रफळा पलीकडे जाऊन
साधारण सगळे रंग एकत्र
गुण्यागोविंदाने नांदू शकतील एवढा
खूप छटा गोळा केल्या आहेत मी
तळहाती जपून आणल्या आहेत
कुठेही सांडू न देता
मूळ छटेत जराही पाणी न मिसळता
आकाशगंगेचा रंग त्यातल्या ग्रह ताऱ्यांचा रंग
शनिचा खास रंगही गवसलाय
अगदी ग्रहणाचाही न वगळता
गुहेत युगानुयुगे लपलेल्या छटानाही
मी हुडकून काढलंय भित्तिचित्रातून
उत्खननातून दगडांची एक छटा सापडलीये
गडप झालेल्या श्वापदांचे रंगही
लागलेत हाती
चित्तवेधक आहे जगभर पसरलेल्या कुटुंबांचा रंग
माझं अन कॅनव्हासचं नातं उलगडून दाखवणारा
त्या रंगाला " दुवा " असं म्हणतात
आता माझा कॅनव्हास
शुभ्र पांढरा झालाय
गोळा करूनही आकाराने सूक्ष्म
------- वैभवी भिडे
त्याच्या क्षेत्रफळा पलीकडे जाऊन
साधारण सगळे रंग एकत्र
गुण्यागोविंदाने नांदू शकतील एवढा
खूप छटा गोळा केल्या आहेत मी
तळहाती जपून आणल्या आहेत
कुठेही सांडू न देता
मूळ छटेत जराही पाणी न मिसळता
आकाशगंगेचा रंग त्यातल्या ग्रह ताऱ्यांचा रंग
शनिचा खास रंगही गवसलाय
अगदी ग्रहणाचाही न वगळता
गुहेत युगानुयुगे लपलेल्या छटानाही
मी हुडकून काढलंय भित्तिचित्रातून
उत्खननातून दगडांची एक छटा सापडलीये
गडप झालेल्या श्वापदांचे रंगही
लागलेत हाती
चित्तवेधक आहे जगभर पसरलेल्या कुटुंबांचा रंग
माझं अन कॅनव्हासचं नातं उलगडून दाखवणारा
त्या रंगाला " दुवा " असं म्हणतात
आता माझा कॅनव्हास
शुभ्र पांढरा झालाय
गोळा करूनही आकाराने सूक्ष्म
------- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment