कधीतरी नुसतं शांत बसावं
काहीच न करता
आभाळ न्याहाळत
चमकदार ढग निरखत
डोळे निवेपर्यंत
भिनू द्यावा निळा रंग
पार तळा पर्यंत
मन भरत नाही
मग तळ करत जावा
अधिकाधिक खोलगट
काठोकाठ भरेस्तोवर
हलू नये जागचं
आवाजांना आदळून
जाऊ द्यावं परत
कोलाहलाच्या भोवऱ्यात
राहू दे काही काळ
जाणिवा अलिप्त
भावनांच्या गर्दीपासून
भाव विरहित दिसत असेल चेहरा जगाला
पण तुम्हाला माहीत असेल
ही खरी ओळख आहे माझी
निळाई ओसंडून वहात असते आसपास
अशीच जन्मभर विनासायास
तिला भेटावसं वाटलं तर
नुसतं शांत बसावं काही न करता
आभाळ न्याहाळत
------ वैभवी भिडे
काहीच न करता
आभाळ न्याहाळत
चमकदार ढग निरखत
डोळे निवेपर्यंत
भिनू द्यावा निळा रंग
पार तळा पर्यंत
मन भरत नाही
मग तळ करत जावा
अधिकाधिक खोलगट
काठोकाठ भरेस्तोवर
हलू नये जागचं
आवाजांना आदळून
जाऊ द्यावं परत
कोलाहलाच्या भोवऱ्यात
राहू दे काही काळ
जाणिवा अलिप्त
भावनांच्या गर्दीपासून
भाव विरहित दिसत असेल चेहरा जगाला
पण तुम्हाला माहीत असेल
ही खरी ओळख आहे माझी
निळाई ओसंडून वहात असते आसपास
अशीच जन्मभर विनासायास
तिला भेटावसं वाटलं तर
नुसतं शांत बसावं काही न करता
आभाळ न्याहाळत
------ वैभवी भिडे
No comments:
Post a Comment