Tuesday, June 17, 2014

मी माझ्या वडाला 
बंधनात जखडलं नाही 
तो आधीच ताठ उभा आहे 
जमिनीत पाय रोवून 
दोन क्षणांचं वादळ 
त्याच्या मुळालाही धक्का लावू शकत नाही 
बऱ्याच जणांना असूया वाटते 
माझ्या बेपरवाईची 
पण हे घोकलेलं वागणं नाही 
शिकलं ते उमजलं 
असं क्वचितच घडतं ना ? 
ज्याचं त्याला कळावं 
आपली जमीन अन आकाश 
मग बहर येतोच कौतुकासाठी 
रोपटयाचे महावृक्ष असेच होतात 

---- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment