Tuesday, June 17, 2014

अजून खूप काही बघायचं बाकी आहे 
अशी कितीशी वर्षं झाली मला 
या पृथ्वी ग्रहावर येउन 
किती करोडो मैल विस्तारलेल्या 
क्षेत्रफळाला अजून माझा पदस्पर्श झालाच नाहीये 

वेगवेगळ्या जंगलांचे रंग डोळ्यांना टिपायचेत 
वन्य जीवांच्या चलत चित्रांसहित 
हरखून जाणे या म्हणीचा जिवंत प्रत्यय अनुभवायचाय 

पाण्याचा रंगही वेगळा असतो म्हणे 
ज्यात मिसळले असेल तसा 
नजर आणि मन निवेल त्याची विविध रूपं बघून 

सूर्य म्हणे कुठे लवकर कुठे नंतर दिसतो 
मला बघायचा आहे वेगवेगळ्या वेळांचा उदय अस्त 
त्याबरोबर बदलणारा आकाश 
एकेक तर उगवताना न्याहाळायचयं 

कित्ती कित्ती बाकी आहे अजून 
अगदी माझ्या शेजारचं गावही 
तिथे म्हणे वारा सुगंधी वहातो 
इतका निर्मळ की नजरही स्वच्छ व्हावी 
माझ्या मनाला टवटवीत करायचय 

पण पण मी पोचेस्तोवर उरलं असेल का हे निसर्गचित्र जसच्या तसं ???????????

----- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment